जुगार अड्डयावर छापा : 1 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त


नगर, (दि. 21 सप्टेंबर) : कोरोना, लॉकडाऊनच्या काळात बंद असलेले अवैध व्यवसाय पुन्हा सुरु झाले असल्याचे चित्र जिल्हयात पाहिला मिळत आहे. आज मल्हार चौकातील गाडीलकर वीटभट्टी शेजारी बांबूच्या झोपडीच्या आडोशाला पोलिसांनी छापा टाकून रोख रक्कम,मोबाईल, मोटारसायकल व जुगार खेळण्याचे साहित्य असे एकूण 1 लाख 85 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.



दरम्यान अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलीस प्रशासन सरसावले आहे. शहरातील मल्हार चौकाशेजारील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून 1 लाख 85 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्या आदेशानुसार उपअधीक्षक संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली हि कारवाई करण्यात आली आहे.


यात पोलिसांनी प्रशांत चंद्रकांत पवार, धनेश दिलीप चव्हाण, गोरख रमेश गायकवाड, सुरेश शिवदास ननवरे, लखन विठ्ठल कुसळकर, अनिल वसंत फुलसौंदर व दोन अज्ञात ईसम यांचे विरुद्ध कोतवाली पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post