नगर, (दि.29 ऑगस्ट) : भिंगार बँक ही सर्वसामान्यांची बँक म्हणून नावारुपास आलेली आहे. सर्वसामान्यांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, त्यांचे जीवनमान उंचविण्यात बँकेचे मोठे योगदान आहे. उद्योजकांनाही कर्जरुपी सहकार्य करुन रोजगारास चालना देण्याचे काम केले आहे. बँकेचे विस्तारात स्व.गोपाळराव झोडगे यांचे मोठे योगदान आहे. त्यांचे हे कार्य नूतन चेअरमन अनिलराव झोडगे पुढे नेतील, त्यांच्या कार्यास आमचेही सहकार्य राहील. अनिलराव झोडगे यांचे बँकिग क्षेत्रातील अनुभव बँकेला प्रगतीपथावर घेऊन जाईल, असे प्रतिपादन माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांनी केले.
भिंगार अर्बन बँकेच्या चेअरमनपदी अनिलराव झोडगे यांची निवड झाल्याबद्दल माजी आ.दादाभाऊ कळमकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी महापौर अभिषेक कळमकर, बँकेचे संचालक नाथा राऊत, अमोल धाडगे, एकनाथ जाधव आदि उपस्थित होते.
सत्कारास उत्तर देतांना चेअरमन अनिलराव झोडगे म्हणाले, सर्वांच्या सहकार्य व प्रेमामुळे भिंगार बँकेची चेअरमनपदाची धूरा आपणावर सोपवली आहे. सर्वांच्या विश्वासास पात्र राहून बँकेचा कारभार चांगल्यापद्धतीने करुन सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करु. आजच्या सत्कारामुळे आपणास प्रेरणा मिळणार आहे, असे सांगून आभार मानले. याप्रसंगी माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी अनिलराव झोडगे यांच्या कार्याचा गौरव केला.