कोविडसंदर्भात राज्यात २ लाख ४३ हजार गुन्हे दाखल; ३४ हजार व्यक्तींना अटक

मुंबई (दि.29 ऑगस्ट) :  लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख ४३ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ३४ हजार ०१७ व्यक्तींना अटक करण्यात आली असून २३ कोटी ३६ लाख ४४ हजार ३९४ रु. दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि. २२ मार्च ते २८ ऑगस्ट या कालावधीत

अत्यावश्यक सेवेसाठी ८ लाख ०३ हजार ३२० पास पोलिसांमार्फत देण्यात आले आहेत.

पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – ३४० (८९१ व्यक्ती ताब्यात)

१०० नंबरवर आलेले फोन – १ लाख ११ हजार १७१

राज्यभरात ज्यांच्या हातावर क्वारंटाईन (Quarantine) असा शिक्का आहे, अशा ८२९ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले.

अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे – १३४७

जप्त केलेली वाहने – ९६,०६४

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना मृत्युमुखी पडलेले पोलीस –
(मुंबईतील ६२ पोलीस व ७ अधिकारी अशा एकूण ६९, नवी मुंबई २, ठाणे शहर १७, पुणे शहर ३, नागपूर शहर ५, नाशिक शहर २, अमरावती शहर १ wpc, औरंगाबाद शहर ३, सोलापूर शहर ३, ठाणे ग्रामीण ३ व १ अधिकारी, पालघर २ व १ अधिकारी, रायगड ३, पुणे ग्रामीण २, सांगली १, सातारा २, कोल्हापूर १, सोलापूर ग्रामीण १, नाशिक ग्रामीण ५, जळगाव  २, अहमदनगर ३, उस्मानाबाद १, बीड १, जालना १, बुलढाणा १, मुंबई रेल्वे ४, पुणे रेल्वे अधिकारी १, औरंगाबाद रेल्वे १, SRPF Gr 3 जालना-१, SRPF Gr 9 -१, SRPF Gr 11 नवी मुंबई १, SRPF Gr 4 -१ अधिकारी, ए.टी.एस. १, PTS मरोळ अधिकारी १, SID मुंबई २ व १अधिकारी )

कोरोना बाधित पोलीस – ३५९ पोलीस अधिकारी व २४१३ पोलीस कर्मचारी

कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग अपेक्षित आहे.  तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.  सर्वांनी नियम पाळून  सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post