नगर, (दि.27 ऑगस्ट) : राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाने हरित लवादाच्या आदेशाने महानगरपालिकेला दरमहा 40 लाख असा एकूण दोन कोटी रुपयांचा केलेला दंड सबंधित अधिकार्यांकडून वसूल करावा अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक डॉ.सागर बोरूडे यांनी आयुक्तांकडे केली आहे.
नगरसेवक डॉ.बोरुडे यांनी आयुक्तांनी दिलेल्या निवेदन म्हटले की, महानगरपालिका हद्दीमधील सीना नदीमध्ये सोडण्यात आलेल्या सांडपाण्याद्वारे होणार्या प्रदुषणापोटी राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळामार्फत हरित लवादाच्या आदेशान्वये दरमहा 40 लाख रुपये असा एकूण दोन कोटी रुपये दंड महानगरपाकेला केलेला आहे.
महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती हलाखीचा असल्यामुळे व सध्या कोविड 19 या आजाराने महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत आहे. त्यामुळे सदरील दंड हा महानगरपालिका हद्दतील करदात्यांकडून वसूल करण्यात येऊ नये.
तसेच सदरील रक्कमेचा आर्थिक बोजा करदात्यांवर टाकल्यास मनपा प्रशासनाच्या विरुद्ध हरित लवादाच्या आदेशाचे उल्लंघन केले असे समजून हरित लवादाकडे दाद मागण्यात येईल असे डॉ. सागर बोरुडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.

Tags:
Ahmednagar