भिंगारमध्ये गणरायाला निरोप : जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्या हस्ते उत्थापन पूजा


 
नगर-भिंगार, (दि.31 ऑगस्ट) :  भिंगार येथील मानाच्या देशमुख गणपतीची उत्थापन पूजा जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्या हस्ते होऊन सनई चौघड्याच्या मंजुळ सुरात मंदिरातच फुलांनी सजवलेल्या कृत्रिम हौदात गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. भिंगारच्या इतिहासात प्रथमच अशी घटना घडली.

कोरोनाचा संसर्ग पसरु नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन यावेळी करण्यात आले. कोरोना कोविड चा संसर्ग पसरु नये यासाठी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करण्यात आले. याप्रसंगी मोजकेच भाविक उपस्थित होते.

ब्राह्मणगल्लीतील देशमुखवाडा गणपती मंदिरात स्वातंत्र्य सैनिकांनी पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला. तेंव्हा पासून येथील मानाचा गणपती मानला जातो. येथील प्रतिष्ठापणा केलेल्या गणरायाला द्वादशीला मोठ्या भक्तीभावाने निरोप दिला जातो. याप्रथेस आज 97 वर्ष पूर्ण झाली. मात्र यंदा मंदिरातच गणरायाची पुजा आरती व लगेचच प्रतिकात्मक विसर्जन झाल्याने इतिहासात याची नोंद झाली आहे.

पुजा व विसर्जनाच्यावेळी पोलिस निरीक्षक अविनाश मोरे. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविण पाटील यासह पोलिस कर्मचारी उपस्थित होते. यावेळी अश्‍विन व कार्तिक देशमुख यांनी अखिलेशकुमार यांचा शाल श्रीफळ देवून सत्कार केला.

कोरोना संसर्गामुळे छावणी परिषद व कँप पोलिसांनी विसर्जन विहिरीवर जाण्यासाठी भाविकांना मनाई केली होती. घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी दोन सजवलेले रथ ठेवण्यात आले  होते. यामध्ये भाविकांनी आपल्या घरातील गणेशमूर्ती दिल्या. त्या गणपती घाट येथील विहिरीत विसर्जन करण्यात आल्या.

Post a Comment

Previous Post Next Post