नवदाम्पत्यांनी वृक्षरोपणाने दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर निमगाव वाघात 

साध्या पध्दतीने बिरोबा मंदिरासमोर लग्न

नगर, (दि.31 ऑगस्ट) : नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बिरोबा मंदिरासमोर अत्यंत साध्या पध्दतीने लग्न पार पडले. तर मंगलाष्टके होताच नवदाम्पत्यांनी वृक्षरोपण करुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

निमगाव वाघा येथे वाळवा (जि. सांगली) येथील सागर शिवाजी भोसले यांचा विवाह निमगाव वाघा येथील आरती संजय जाधव यांच्याशी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर साध्या पध्दतीने बिरोबा मंदिरासमोर मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळ, स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था आणि श्री नवनाथ युवा मंडळाच्या पुढाकाराने सुरु असलेल्या वृक्षरोपण व बीजरोपण उपक्रमांतर्गत नवदाम्पत्यांच्या हस्ते वृक्षरोपण करुन वर्हाडी मंडळाच्या हस्ते देखील मंदिराच्या आवारात झाडे लावण्यात आली.

फिजीकल डिस्टन्स व नियमांचे पालन करुन हा विवाह सोहळा झाला. यावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा निसर्ग व पर्यावरण मंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष पै.नाना डोंगरे, संजय जाधव, अनिल डोंगरे, अतुल फलके, जालिंदर आतकर, संदिप डोंगरे, दिपक जाधव, देवाचे भगत नामदेव भुसारे, एकनाथ भुसारे, मधुकर कापसे, सुरेश ताठे, खंडू जाधव आदि उपस्थित होते.

जागतिक तापमानात सातत्याने होणारी वाढ, वाढत्या शहरीकरणामुळे झांडांची कत्तल, निसर्गाचा ढासाळलेला समतोल यामुळे दुष्काळासह अवकाळी पाऊस या नैसर्गिक संकटांचा सामना सर्वांना करावा लागत आहे.

पर्यावरणाचे समतोल साधण्यासाठी वृक्षरोपण व संवर्धन हा एकमेव पर्याय असून, संस्थेच्या वतीने एक हजार झाडे लाऊन ते जगविण्याचा संकल्प आहे. तसेच विविध भागात बीजरोपण देखील करण्यात आले असल्याचे पै.नाना डोंगरे यांनी सांगितले. तर जन्म, वाढदिवस, विवाह, मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या स्मरणार्थ तसेच सण, उत्सव काळात वृक्षरोपण करुन ही चळवळ व्यापक करण्याचे त्यांनी आवाहन केले. 

Post a Comment

Previous Post Next Post