प्रगत तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांची प्रगती : चंदना सोनवणे


नगर, (दि.29 ऑगस्ट) : कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर  शाळा बंद असल्याने  वंजारवाडी (नेवासा) येथील जिल्हा परिषद शाळेच्या पदवीधर शिक्षिका चंदना सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईनचे धडे देत आहेत. या शाळेमधील 1 ली ते 7 वी च्या विद्यार्थ्यांना सध्या कोरोनामुळे शाळा बंद असल्याने ‘ऑनलाईन शिक्षणाचे धडे’ त्या देत आहेत. वाडी-वस्तीवरील विद्यार्थीही ऑनलाईन धडे गिरवित असून, या उपक्रमाचे पालकांनी कौतुक केले आहे. वंजारवाडीतील 7 वी चा मोठा वर्ग, विषय यामुळे फक्त व्हॉटस्अप ग्रुपच्या सहाय्याने अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा ध्यास श्रीमती सोनवणे यांनी घेतला आहे.

ज्या पालकांकडे स्मार्ट फोन आहे, त्यांना गुगल मेट बद्दल मार्गदर्शन करुन डाऊनलोड करुन, पाल्याचा अभ्यास कसा करुन घ्यायचा याबाबत माहिती दिल्याने त्याचा फायदा पालकांनी करुन घेतला. ज्यांना ऑनलाईन वेळ मिळत नाही, त्यांना अध्यापनाचे धडे व्हिडिओ  ग्रुपवर शेअर करतात, परंतु अध्यायनात त्या खंड पडू देत नाहीत. त्यांच्या या उपक्रमाचे नेवासा तालुका गटशिक्षणाधिकारी सुलोचना पटारे, विस्तार अधिकारी शिवाजी कराड, केंद्रप्रमुख जाधव, महमीनी, मुख्याध्यापक कुसळकर यांनी कौतुक केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post