कोरोना काळात खेळाडूंनी भविष्यातील यशाची तयारी करावी : चंद्रकांत चौगुले

नगर, (दि.30 ऑगस्ट) : भारताचे श्रेष्ठ हॉकीपटू ध्यानचंद यांची जयंती ही राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केली जाते. त्यानिमित्त अहमदनगर हायस्कूल मराठी माध्यम व जकेरिया आघाडी प्राथमिक शाळेत मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करुन प्रतिज्ञा घेण्यात आली. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत चौगुले, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका जाकेरा मॅडम, सौ.मेषा कुलकर्णी, अन्सार सर, शेख मॅडम, सुवर्णा हर्लेकर, परतारे सोनी आदि उपस्थित होते.

यावेळी प्राचार्य चौगुले आपल्या मनोगतातून म्हणाले, मेजर ध्यानचंद हे हॉकीचे जादूगार होते. हॉकी म्हणजे त्यांचा जीव की प्राण होता. प्रचंड कष्ट आणि सरावाच्या जोरावर ध्यानचंद यांनी अनेक आंतरराष्ट्रीय सामान्यात विजय पटकावून पदकेही मिळवून दिली. 

आज कोरोनामुळे क्रीडा स्पर्धा, शाळा  बंद असल्यातरी खेळाडूंनी आपल्या घरीच सराव सुरु ठेवावा. मिळालेल्या वेळाचा सद्उपयोग करुन भविष्यातील यशाची तयारी या काळात करावी. शाळेमध्येतील विद्यार्थ्यांनाही विविश खेळांसाठी  प्रोत्साहन दिले आहेत. अनेक विद्यार्थी जिल्हा व राज्य पातळीवर चमकलेही आहेत. पुढील काळत क्रीडा क्षेत्रात शाळा चमकदार कामगिरी करले, असा विश्‍वास व्यक्त केला.

यावेळी मुख्याध्यापिका जाकेरा मॅडम यांनी विद्यालयातील कामकाजाचा आढावा सांगितला. अन्सार सर यांनी सर्वांचे  आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post