मुंबई, (दि.27 ऑगस्ट ) : उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजीव जलोटा यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील तरतुदींबाबत त्यांचेपुढे सादरीकरण केले.
राज्य शासन नव्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने तयार करीत असलेल्या कृती आराखड्याबद्दल देखील त्यांनी यावेळी माहिती दिली. यावेळी राज्यपालांनी विविध विषयांवर निरीक्षणे नोंदवीत उपयुक्त सूचना केल्या.
शिक्षणातील सार्वजनिक गुंतवणूक वाढविणे, सन २०२५ पर्यंत उच्च शिक्षणातील नोंदणी प्रमाण ५० टक्के इतके वाढविणे, शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण, मातृभाषेतून शिक्षणाला चालना देणे, डिजिटल ग्रंथालये, व्यवसायिक शिक्षणावर भर, या तसेच धोरणातील इतर तरतुदींसंदर्भात राज्यपालांना विस्तृत माहिती देण्यात आली.
तंत्र शिक्षण संचालक डॉ. अभय वाघ हे देखील यावेळी उपस्थित होते.
Tags:
Maharashtra