धार्मिकता ही मानवी जीवनातील श्रद्धास्थान : अजय चितळे

भाजपाच्यावतीने मंदिरे उघडावी यासाठी 

“दार उघड उद्धवा, दार उघड” आंदोलन


नगर, (दि.29 ऑगस्ट) : भारतीय जनता पार्टीच्यावतीने आज राज्यातील बंद असलेले मंदिरे उघडण्यासाठी "दार उघड उद्धवा, दार उघड" हे आंदोलन करण्यात आले.  नगर शहरच्या वतीने मंडल अध्यक्ष अजय चितळे यांच्या नेतृत्वाखाली लक्ष्मी कारंजा या ठिकाणी हनुमान मंदिरासमोर आंदोलन करण्यात आले. 

यावेळी बोलताना अजय चितळे म्हणाले की, गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोना महामारी जगभरात आलेली आहे. अनेक देश कित्येक महिने लॉक डाऊनच्या अवस्थेत होते. आपला भारत देश ही त्यातून सुटू शकला नाही. भारतात सुद्धा मार्च महिन्यापासून लॉक डाऊन करण्यात आलेला होता. लॉकडाउनच्या काळापासून मंदिरे बंद अवस्थेत आहेत. शासनाने सर्व प्रकारचा लॉक डाऊन आता उठवलेला आहे. सर्व  व्यवहार सुरळीत पद्धतीने आता सुरू झालेले आहेत. 

महसूल गोळा होणेसाठी अगदी दारूचे दुकाने, हॉटेल्स ही उघडण्यात आलेले आहेत, परंतु मंदिरे आजही बंद अवस्थेतच आहेत. नागरिकांचा देवदेवतांवरचा विश्वास आजही कायम आहे. धार्मिकता ही मानवी जीवनातील श्रद्धास्थान आहे. तरी राज्य सरकारने लवकरात लवकर मंदिरे उघडावी, यासाठी भाजपाच्यावतीने मंदिरे उघडण्यासाठी “दार उघड उद्धवा, दार उघड” हे आंदोलन करण्यात आले, असे प्रतिपादन भाजपा मध्य मंडल अध्यक्ष अजय चितळे यांनी केले.

भाजपाच्यावतीने राज्यभर बंद असलेली मंदिरे उघडण्यासाठी “दार उघड उद्धवा, दार उघड" गांधी मैदान येथील हनुमान मंदिर येथे महाआरती करण्यात आली. यावेळी भाजप मध्यमंडल अध्यक्ष अजय चितळे, माजी नगरसेवक नरेंद्र कुलकर्णी, उपमहापौर मालनताई ढोणे, माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी, अँड. विवेक नाईक आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post