संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उध्दव शिवले यांनी दिले नियुक्तीपत्र
नांदेड, (दि.31 ऑगस्ट) : मराठा बंधू-भगिणिंना संघटीत करुन त्यांच्या प्रश्न-समस्या सोडविण्याच्या उद्देशाने निर्माण करण्यात आलेल्या ‘मराठा जोडो अभियान’ महाराष्ट्र या सामाजिक संघटनेच्या नांदेड शहराध्यक्षपदी नांदेड येथील सामाजिक कार्यकर्त्या अलका प्रकाशराव मोरे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उध्दव शिवले यांनी दिली आहे.
संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष उध्दव शिवले यांनी अलका मोरे यांना नियुक्तीपत्र दिले आहे. मराठा जोडो अभियान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उध्दव शिवले यांच्यासह संघटनेच्या विविध जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अलका मोरे यांचे अभिनंदन करुन पुढील कार्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.
Tags:
Maharashtra