नगर, (दि.29 ऑगस्ट) :वृत्तपत्र विक्रेते आपल्या व्यवसायात तहान-भूक हरवून काम करतात, पण आरोग्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक गोळ्या बरोबरच सकस आहारावर लक्ष देऊन तो नित्यनियमाने घ्यावा, असे आवाहन वृत्तपत्रविक्रेते संघटनेचे उपाध्यक्ष संजय गोरे यांनी केले.
सावेडी येथे श्रीविश्ववती आयुर्वेद चिकित्सालय व संशोधन केंद्र व नगर येथील दिव्यस्पर्श पंचकर्म केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने 150 विक्रेत्यांना मोफत आयुर्वेदीक गोळ्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी गोरे बोलत होते. याप्रसंगी संघटनेचे सचिव प्रमोद पंतम, सदस्य राहुल लिमये, पुरुषोत्तम मडूर, विजय मते आदी उपस्थित होते.
गोरे म्हणाले, कोरोनाच्या संकटात आपल्याला सावेडीमधील होमिओपॅथी डॉक्टर्स वृत्तपत्रांच्या कार्यालयामार्फत अर्सेनिक गोळ्या, मास्क, सॅनिटायझर्स वाटप करण्यात आले. याचा लाभ सर्वांनी घेतला. आज या ट्रस्टतर्फे गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
सचिव पंतम यांनी ट्रस्टतर्फे नगरमध्ये पोलिस दलात 1850, अंभोरा पोलिस स्टेशन 50, वाघळूज चेक पोस्ट 50, महसूल विभाग 100 तर वाघळूज गांवात 1000 अशा गोळ्यांचे पॅकेट वाटून सेवा केली. याबाबत या ट्रस्टचे, डॉक्टरांचे आभार मानले. आभार विजय मते यांनी मानले.