नगर, (दि.29 ऑगस्ट) : नगर शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने, कोरोना महामारीच्या काळात नागरिकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी अत्यंत गुणकारी अशा होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप महापौर बाबासाहेब वाकळे व भाजप चे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र भैय्या गंधे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका पल्लवी जाधव यांच्या वतीने प्रभाग क्रमांक 6 मधील सिद्धिविनायक मंदिर परिसर येथे करण्यात आले.
यावेळी नगरसेवक रविंद्र बारस्कर, भाजप शहर कार्यकारिणी सदस्या स्वाती पवळे, मनोज ताठे, अशोक भालेराव, पौर्णिमा देवधर, मिलिंद आहेर, शीतल आहेर, अर्चना कुलथे, मंजिरी जामगांवकर, शिंदे व परिसरातील नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी कोरोना महामारी चे सर्व नियम पाळून, मास्क व सॅनिटायझरचा वापर तसेच सोशल डिस्टनसिंगचे काटेकोरपणे पालन करून हा कार्यक्रम घेण्यात आला.
महापौर बाबासाहेब वाकळे यांनी उपस्थित नागरिकांना कोरोना काळात आपल्या आरोग्याची घ्यावयाची दक्षता त्याचप्रमाणे रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी अत्यंत गुणकारी अशा होमिओपॅथीक गोळ्यांचे सेवन कशा प्रकारे करायचे याबाबत माहिती दिली.
Tags:
Ahmednagar