पाण्याची आवक टिकून असल्याने मुळाच्या पाणीसाठ्यात वाढ


नगर, (दि.30 ऑगस्ट) : प्रदीर्घ विश्रांतीनंतर मुळा धरणाच्या कार्यक्षेत्रात पाऊस झाल्याने पाणीसाठ्यात  वाढ होऊ लागली आहे. गेल्या दोन दिवसांपासून धरणाच्या कार्यक्षेत्रात समाधानकारक पाऊस  होत  आहे. शनिवारी कोतूळकडून मुळा धरणात सुरू असलेली पाण्याची आवक पाहता रविवारी दुपारी 3 वाजेपर्यंत मुळा धरणाचा पाणीसाठा 25 हजार दशलक्ष घनफुटाचा टप्पा गाठणार आहे. कोतूळ पाण्याची आवक टिकून राहिल्यास सोमवारी दुपारी मुळा धरणातून मुळा नदीपात्रात पाणी सोडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

26 हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या राहुरीच्या मुळा धरणाचा शनिवारी सायंकाळी 6 वाजता पाणीसाठा 24 हजार 665 दशलक्ष घनफूट झाल्याने धरण 95 टक्के भरले आहे.

शनिवारी सकाळी कोतूळकडून मुळा धरणात 5 हजार 668 क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. दुपारी 12 वाजता 3 हजार 822 क्युसेकने, तर सायंकाळी 6 वाजता 3 हजार 212 क्युसेकने पाण्याची आवक सुरू राहिली.

यावर्षी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मुळाचा साठा जवळापास 95 टक्यावर जावून पोहचला आहे. मुळा धरण क्षेत्रात पावसाची आवक आद्यापही सुरु असल्याने पाणीसाठ्यात वाढत होताना दिसत आहे. पाण्याची आवक अशी सुरु राहिल्यास लवकरच मुळा धरण भरण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post