सीनानदी पूल ते जाधव पेट्रोल पंप पर्यंत रस्ता दुरुस्तीची मागणी :
अन्यथा पै.सुभाषभाऊ लोंढे मित्र मंडळाच्या वतीने रास्ता रोकोचा इशारा
नगर (दि.28 ऑगस्ट) : नगर-कल्याण रोड येथील सीनानदी पूल ते जाधव पेट्रोल पंप पर्यंत रस्त्याची मोठी दुरावस्था झाल्याने पै.सुभाषभाऊ लोंढे मित्र मंडळाच्या वतीने खड्डयात झाडे लावून गुलालाची उधळण करीत आंदोलन करण्यात आले.
अपघाताला कारणीभूत ठरणार्या सदर रस्त्याची तातडीने दुरुस्तीचे काम न झाल्यास येत्या सात दिवसात पुर्वसूचना न देता रास्ता रोको करण्याचा इशारा स्थानिक नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे.
या आंदोलनात संतोष शिंदे, योगेश चौधरी, सुरज शिंदे, महेश चव्हाण, छाया नागुल, सुनील अबनावे आदिंसह परिसरातील नागरिक सहभागी झाले होते. सीनानदी पूल ते जाधव पेट्रोल पंप पर्यंत रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे. राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा असून, देखील या रस्त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
खड्डेमय रस्त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून जावे लागत असून, या रस्त्यावर अनेक लहान-मोठे अपघात घडत असून, या रस्त्याची दुरुस्ती करण्याची स्थानिक नागरिकांची मागणी आहे.
Tags:
Ahmednagar