शिवसेनेच्या टिकेला मनसेचं प्रत्युत्तर

 
ज्यांचा पक्ष आणि सरकार अजित पवार चालवतात त्यांनी आम्हाला शिकवू नये  : अविनाश जाधव
शिवसेनेच्या टिकेला मनसेचं प्रत्युत्तर


मुंबई  (दि.09): मनसेच्या मोर्चाला भाजपची साथ असल्याच्या शिवसेनेच्या टीकेला मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी प्रतिउत्तर दिले आहे . उद्धव ठाकरेंच्या चुकीच्या राजकीय भूमिकेमुळे तळागळातील शिवसैनिक नाराज आहेत. येणाऱ्या काळात शिवसेनेला खिंडार पडेल, असं भाकीत अविनाश जाधव यांनी वर्तविले आहे.

शिवसेनेनं भाजपची साथ सोडली आहे. त्यामुळं त्यांना कुणाचा तरी आधार हवा आहे. वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग मधल्या काळात त्यांनी करून पाहिला. पण तोही फसला आहे. त्यामुळं भाजप आता मनसेला सोबत घेण्याचा प्रयत्न करतेय. आशिष शेलार यांनी गेल्या काही दिवसांत घेतलेल्या राज ठाकरेंच्या भेटी हे त्याचंच द्योतक आहे. या बैठकांमध्येच मोर्चाच ठरलंय हे आता स्पष्ट दिसतंय. हे सगळे पाहिल्यास आजच्या मोर्चामागे भाजप असू शकते,’ असा आरोप शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी केला आहे .

बांगलादेशी व पाकिस्तानी घुसखोरांविरुद्ध मुंबईत आज निघणाऱ्या मनसेच्या मोर्चावरून राजकारण रंगू लागलं आहे. मनसेच्या आजच्या मोर्चामागे भारतीय जनता पक्षाचा हात असल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे. यावर प्रतिउत्तर देताना जाधव म्हणाले की, शिवसेना राज्यात सत्तेत सहभागी आहे, मात्र हे सरकार राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार चालवत आहेत. असंच सुरु राहिलं तर काही दिवसांनी शिवसेनादेखील अजित पवारच चालवतील. आजच्या घडीला मुख्यमंत्री म्हणून जेवढी गर्दी उद्धव ठाकरे यांच्याकडे नसते, त्याहून कित्येक पटीने जास्त गर्दी अजित पवारांकडे असते. त्यामुळे ज्यांचा पक्ष आणि सरकार राष्ट्रवादी चालवते, त्यांनी आम्हाला शिकून नये की आमचा मोर्चा कोण स्पॉन्सर करत आहे, अशी सडकून टीका अविनाथ जाधव यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post