जिल्हा परिषदेतील परिचरांना कालबध्द पदोन्नतीचा लाभ
नगर (दि.06) : जिल्हा परिषदेत जवळपास साडेसोळा हजार कर्मचारी कार्यरत आहेत. यात परिचर संवर्गाची संख्या बरीच मोठी आहे. या संवर्गाकडून अनेक मागण्या वेळोवेळी करण्यात येत होत्या. 10 - 20 वर्षांचा लाभ त्वरित मिळावा हि प्रमुख मागणी मान्य करण्यात आली आहे. नवीन शासन निर्णयानुसार सुधारणा करून दहा, वीस व तीस वर्षांचा लाभ मिळवून देण्याची कार्यवाही प्रशासनाने केली आहे. त्यामुळे परिचरांच्या वेतनात वाढ होणार असून त्यांना काम करताना प्रोत्साहन मिळणार आहे. यापूर्वी बारा व चोवीस वर्षाच्या कालबध्द पदोन्नतीचा लाभही मिळवून देण्यात आला आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी केले.
नगर जिल्हा परिषदेतील परिचर संवर्गातील पात्र कर्मचार्यांना कालबध्द पदोन्नतीचा लाभ मिळवून देण्यात आला आहे. या कार्यवाहीबद्दल जि.प.चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेच्यावतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोळंके यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष अशोक काळापहाड, कक्ष अधिकारी शिवाजी भिटे, हेमंत कुलकर्णी, राजेंद्र गायकवाड, रामचंद्र वाघ, प्रमोद राऊत, सुरेश भोजणे, सागर आगरकर, लहानू उमाप, जयसिंग कडूस, चंद्रभान वैराळ, अनुप गायकवाड, सचिन दिवटे, अनिल वांजवडे, निलेश गोरे, सोमनाथ त्रिमुखे, सागर राक्षे, महेश जाधव, किशोर फुलारी, मनोज चोभे, अनिल येनगूल, विजया गायकवाड, मीता पतंगे, मिना पाडळे आदी उपस्थित होते.
अशोक काळापहाड म्हणाले की, जिल्हा परिषदेतअंतर्गत सर्व परिचरांना कालबध्द पदोन्नतीचा लाभ मिळाला आहे. परिचर संख्या मोठी असून अनेक वर्षांपासून पात्र परिचर पदोन्नतीच्या प्रतिक्षेत होते. याबाबत संघटनेने केलेल्या पाठपुराव्याला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे अनेक परिचरांना याचा लाभ मिळाला आहे. उर्वरित पदोन्नती पात्र कर्मचार्यांनाही लवकरच प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. गुणवंत परिचर पुरस्कार देण्याबाबतही प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
Tags:
Ahmednagar