डॉ.बाळ ज.बोठे पाटील यांना आदर्श पत्रकारिता पुरस्कार प्रदान



नगर (दि.04) : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा आदर्श पत्रकारिता विशेष सन्मान पुरस्कार ‘सकाळ’चे कार्यकारी संपादक अ‍ॅड. डॉ. बाळ ज. बोठे पाटील यांना आज पुण्यात माजी राज्यपाल डॉ.डी.वाय.पाटील व ‘इस्कॉन’चे लोकनाथ स्वामी महाराज यांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.

यावेळी भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर, दादा महाराज नगरकर, संघाचे संघटक संजय भोकरे, प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, सरचिटणीस विश्‍वास आरोटे, नवशक्तीचे संपादक सुकृत खांडेकर, टीव्ही 9 चे संपादक उमेश कुमावत, इंदूरच्या ‘वेबदुनिया’चे  संपादक संदीप सिसोदिया, ‘क्रीडावेध’चे संपादक सतीश बांदल, लोकमत (सोलापूर)चे संपादक सचिन जवळकोटे व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ.बाळ ज.बोठे पाटील यांना आदर्श पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे राज्यातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, आदीसह शिक्षण, कला, सांस्कृतीक, सामाजिक, सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी  अभिनंदन केले आहे. तसेच त्यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post