राजपत्रीत अधिकारी संघटनेचे अधिवेशेन आणि वार्षिक सर्वसाधारण सभा शिर्डीत संपन्न
नगर, (दि.10) : महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा व राज्यस्तरीय अधिवेशन दि.8 फेब्रुवारी रोजी रोजी साई पालखी निवारा, शिर्डी, जिल्हा अहमदनगर येथे पार पडली. अधिवेशनास महाराष्ट्रातुन मोठया प्रमाणात अधिकारी उपस्थित होते. अधिवेशनाचे सुरवातीस महाराष्ट्र विकास सेवेतील दिवंगत अधिकारी यांना श्रध्दाजली वाहुन कामकाज सुरु करण्यात आले.
यावेळी प्रथम महाराष्ट्र राज्याचे नव्याने निवड झालेल्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री, ग्रामविकास अब्दुल सत्तार व इतर मंत्री मंडळाचे अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. मा. अरविंद कुमार यांची ग्रामविकास विभागाचे अति. मुख्य सचिव म्हणुन नियुक्ती झालेबद्दल अभिंनदनाचा ठराव घेण्यात आला. तसेच महाराष्ट्र विकास सेवेतील अधिकारी लहु कानडे यांची आमदार पदी निवड झालेने त्याचे अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.
तद्नंतर महाराष्ट्र विकास सेवेतुन भारतीय प्रशासन सेवेत नियुक्ती झालेले डॉ हेमंत वसेकर व श्रीम. लिना बनसोड यांचे अभिनंदनाचा ठराव करुन, महाराष्ट्र विकास सेवेतील 11 अधिकारी यांची मंत्री, महाराष्ट्र शासन यांचेकडे खाजगी सचिव/ विशेष कार्यासन अधिकारी म्हणुन नियुक्ती झालेने त्यांचा सत्कार नृसिंह मित्रगोत्री, संचालक, आरजीपीए यांचे हस्ते करण्यात आला. तसेच महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत महाराष्ट्र विकास सेवेच्या अधिकारी यांचे गरजेनुसार काढलेल्या परिपत्रकाबाबत संदिप भुमरे, रोजगार हमी, फलोत्पादन व एकनाथ डवले, प्रधान सचिव, रोहयो यांचे अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.
अधिवेशनात महाराष्ट्र विकास सेवेतील अधिकारी यांचे अडीअडचणी, दैंनदिन कामकाज व अपेक्षित बदल, संघटनेचे धोरण इत्यादीबाबत सविस्तर चर्चा करुन सघटनेच्या लेखापरिक्षण अहवाल व मागील सभेचे इतिवृत्तास मंजूर देण्यात आली. यावेळी चंद्रकांत वाघामारे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिप पालघर व ओमप्रकाश यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिप परभणी यांनी विकास सेवा, कामकाज व भविष्यातील वाटचाल याबाबत उत्कृष्ट सादरीकरण केले.
सन 2020 ते 2022-23 साठी राज्यकार्यकारणीची तसेच विभाग कार्यकारीणीची बिनविरोध निवड करण्यात आली. यामध्ये नृसिंह मित्रगोत्री, संचालक, आरजीपीए, गणेश चौधरी, प्रकल्प संचालक, चंद्रकांत वाघमारे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. पालघर व अशोक पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा खाजगी सचिव, मंत्री, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग यांचे यांनी महत्वाची भुमिका पार पाडली.
यामध्ये अध्यक्ष म्हणुन अशोक सिरसे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा खाजगी सचिव मंत्री, रोजगार हमी, फलोउत्पादन, उपध्याक्ष - राजेश कुलकर्णी, प्रकल्प संचालक, जिग्राविय यवतमाळ, कार्याध्यक्ष - प्रकाश खोपकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा), जि.प. रायगड, कोषाध्यक्ष -रत्नाकर पगार, सहा गटविकास अधिकारी, पंस सुरगाणा, जि नाशिक, सरचिटणीस म्हणुन दुस-यावेळी निवड - वासुदेव सोळंके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा), जि.प. अहमदनगर, सहसरचिटणीस - डॉ सुनिल भोकरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप), जि.प. औंरगाबाद व महिला प्रतिनिधी - श्रीमती दिपाली देशपांडे, अतिमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रतिनियुक्तीने) यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या सर्व कार्यकारीणी सदस्याचे अभिनंदन नृसिंह मित्रगोत्री, संचालक, आरजीपीए यांनी केले.
या अधिवेशनास व्यवस्थेबाबत राहाता पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री समर्थ शेवाळे व महाराष्ट्र विकास सेवेतील अहमदनगर जिल्हयातील अधिकारी यांनी केलेल्या नियोजनाबाबत आभार मानन्यात आले.
Tags:
Maharashtra