मुंबई (दि.05) : सांगलीमध्ये होणार्या 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष पद राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार भूषवणार आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी स्वागताध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती केली होती. कांबळी यांच्या विनंतीचा आनंदपूर्वक स्वीकार करत असल्याचे ट्विट खुद्द शरद पवार यांनीच केले.
जागतिक रंगभूमी दिनानिमित्त 27 मार्चपासून सांगलीत अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन सुरू होणार आहे. 26 मार्चला सांगलीत नाट्यदिंडी काढण्यात येईल. त्यानंतर 27 मार्च रोजी नाट्य संमेलनाचे उद्घाटन होईल. मात्र, समारोप 14 जून रोजी मुंबईत होईल, अशी माहिती अखिल भारतीय नाट्य परिषदेने पत्रकार परिषदेत दिली. 27 मार्च ते 7 जून या कालावधीत महाराष्ट्रातील विविध ठिकाणी छोटेखानी नाट्य संमेलने रंगतील.
Tags:
Maharashtra