नगर (दि.09) : शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहीनी नांदगाव शिंवारात लिक झाल्याने सोमवारी पाणीपुरवठा होणार नाही तरी नागरीकांनी पाण्याचा जपुन वापर करावा असे आवाहन नगरसेवक गणेश भोसले यांनी केले आहे.
माहिती अशी की, रविवार दि .09 फेब्रुवारी 2020 रोजी सायं 6.00 वाजलेच्या सुमारास शहर पाणी योजनेची नविन मुख्य जलवाहीनी (1100 एमएम) नांदगांव शिवारात सोनवणे वस्ती जवळ पाण्याच्या व हवेच्या दाबाने लिकेज झालेली असुन त्यामधुन मोठ्या प्रमणात पाणी गळती होत आहे . सदर जलवाहीनी दुरुस्तीचे काम महानगरपालीके मार्फत तातडीने हाती घेण्यात आलेले आहे. परंतु दुरुस्ती कामास अवधी लागणार आहे . परिणामी उद्या सोमवार दि 10 फेब्रुवारी 2020 रोजी रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराचा मध्यवर्ती भागाचा म्हणजेच लालटाकी, दिल्लीगेट, नालेगाव, चितळेरोड, आनंदी बाजार, कापड बाजार, तोफखाना, सर्जेपुरा , माळीवाडा आदी भागत पाणी पुरवठा होण्याची शक्यता कमी आहे. तसेच सावेडी, बालीकाश्नम रोड, कल्याण रोड परिसर स्टेशन रोड परिसर, आगरकर मळा परिसर, विनायक नगर परिसर इत्यादी उपनगर भागाचा पाणी पुरवठा बंद राहाणार आहे. तरी नागरिकांनी पाणी जपून वापरून सहकार्य करावे असे आवाहन नगरसेवक गणेश भोसले यांनी केले आहे.
Tags:
Ahmednagar