नगर (दि.07) : महानगरपालिकेची पोटनिवडणुक नुकतीच पार पडली. पोटनिवडणुकीत भाजपाच्या पल्लवी जाधव या विजयी झाल्या आहेत. जाधव यांना निवडणुक अधिकारी असीमा मित्तल यांच्या हस्ते प्रमाणपत्र पदान करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी तथा मनपाचे प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी उपस्थित होते.
महानगरपालिकेच्रा प्रभाग 6 मध्रे अनुसूचित जमाती महिला प्रवर्ग रा रिक्त जागेसाठी गुरुवारी मतदान झाले. आज सकाळी या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये भाजपच्या उमेदवार पल्लवी जाधव या विजयी झाल्या आहे. भाजपाच्या जाधव रांनी 2 हजार 915 मते मिळवून विजर मिळविला आहे. तर महाविकास आघाडीच्रा शिवसेनेच्रा उमेदवार अनिता दळवी यांना 1203 मते मिळाली आहे.
पल्लवी जाधव यांच्या निवडीनंतर महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालनताई ढोणे, शहरजिल्हाध्रक्ष महेंद्र गंधे, सुवेंद्र गांधी, नरेंद्र कुलकर्णी, आदींसह भाजपच्या नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
उमेदवार फेरी एकूण मतदान
पल्लवी जाधव (भाजप) 741 - 866 - 710 - 598 - एकूण 2915
अनिता दळवी (मविआ) 192- 282- 250 - 479- एकूण 1203
एकूण
पल्लवी जाधव (भाजप) 2915
अनिता दळवी (मविआ) 1203
नोटा 119
Tags:
Ahmednagar