पदवी ग्रहण समारंभात सन्मान
नगर (दि.06) : अहमदनगर महाविद्यालयाची विद्यार्थिनी सायली शिंदे ही कॉम्प्युटर सायन्समध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली. 5 फेब्रुवारी 2020 रोजी अहमदनगर कॉलेज येथे सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे यांच्या विद्यमाने पार पडलेल्या पदवी ग्रहण समारंभात सायलीचा सन्मान करण्यात आला.
महाविद्यालयाचे प्राचार्य आर. जे. बार्नबस यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. तिला शिक्षकवृंद, आई, वडील, आजी, आजोबा यांचे मार्गदर्शन लाभले. सामान्य परिस्थितीतही असामान्य कर्तृत्व करता येते हेच सायलीने दाखवून दिल्याचे मनोगत तिच्या शिक्षकांनी यावेळी व्यक्त केले. विविध स्तरांतून तिचे कौतुक होत आहे. वर्तमानपत्र क्षेत्रातील संदीप शिंदे यांची ती पुतणी आहे.
Tags:
Ahmednagar