आझाद मैदानावरील आंदोलनास संभाजी ब्रिगेडचा पाठींबा: सुहास राणे

मुंबई (दि.04) : मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर अनेक विभागात नोकरभरती झाली. नोकरभरतीच्या सर्व प्रक्रिया झाल्या. मात्र नियुक्त्या झाल्या नाहीत. याबाबत मराठा तरुण आझाद मैदानात आंदोलनासाठी बसले आहेत त्यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने जाहीर पाठींबा देण्यात आला असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र उपाध्यक्ष सुहास राणे यांनी दिली.

यावेळी ते म्हणाले की, गेल्या सात दिवसांपासून सुरू आहे. मराठा आरक्षण महाराष्ट्र अधिनियम क्र. 63/2018 मधिल कलम 18 नुसार मराठा समाजातील एसईबीसी - ईएसबीसी उमेदवारांना नियुक्ती मिळाली पाहिजे या मागणीसाठी बेमुदत ठिय्या आंदोलन  मुंबई येथे आझाद मैदानावरु सुरु त्याला आमचा जाहीर पाठींबा असुन प्रश्‍न सुटत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहिल असे राणे म्हणाले.

विद्यार्थ्यांच्या संविधानीक मागण्यांसाठी, संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मनोज आखरे, महासचिव सौरभ खेडेकर यांनी केलेल्या सुचनेनुसार संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र उपाध्यक्ष सुहास राणे यांनी आंदोलकांनाची भेट घेतली. संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रच्या वतिने जाहीर पाठिंबा दिला व आंदोलनात आपल्या पदाधिकारी सहभाग नोंदविला त्यावेळी त्यांच्या सोबत संभाजी ब्रिगेड उत्तर मध्य मुंबई जिल्हा सचिव सुदाम साहील, जिल्हा सहसचिव नयनभाई पुंभाडीया (प्रजापती), शाखा अध्यक्ष सचिन वाकोडे आदींसह संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post