जि. प. कर्मचार्‍यांसाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन

नगर (दि.05) :  जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा क्रीडा संकुल, वाडिया पार्क, नगर येथे 14 ते 16 फेब्रुवारी दरम्यान या स्पर्धा रंगणार आहेत.

स्पर्धेचे उद्घाटन अध्यक्षा राजश्रीताई घुले यांच्या हस्ते होईल. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, उपाध्यक्ष प्रताप शेळ- के, सभापती सुनील गडाख, काशिनाथ दाते, उमेश परहर, मीराताई शेटे, समिती सदस्य तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके आदी उपस्थित राहणार आहेत.

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धामध्ये क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, खो-खो, बुध्दिबळ, बॅडमिंटन, बास्केट बॉल, फुटबॉल, टेबल टेनिस, जलतरण, कॅरम, धावणे या स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच सांस्कृतीक कार्यक्रम स्पर्धेत गायन, नृत्य, एकांकीका, भजन, लावणी, विनोदी कार्यक्रम, नाटक, वाद्य इ. प्रकारच्या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.

क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमात प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या स्पर्धकांना जिल्हा परिषदेमा़र्फत गौरविण्यात येणार आहे. रोजच्या प्रशासकीय कामकाजातून वर्षातील एक दिवस विरंगुळा व मनोरंजन म्हणून या कार्यक्रमास उपस्थित राहून सहभागी होण्याचे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोळंके यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post