नगर (दि.04) : नगर - औरंगाबाद रोडवरील गजराजनगर जवळ असलेल्या गादी कारखान्याला लाग लागल्याने येथील गादी कारखान्यातील वस्तु जळून भस्मसाद झाल्या. या आगीचा फटका जवळच असलेल्या बांबू व्यवसायीकांना आणि टपरी चालकांना बसला आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या पथकाने प्रयत्न करुन ही आग अटोक्यात आणली आहे. या आगीत लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी दुपारी 4 च्या सुमारास शॉर्ट सर्किटने गादी कारखाना पेटला. शेजारीच बांबूचा कारखाना असल्याने आगीची झळ या कारखान्याला बसली. सदरचा गादी कारखाना हा अमिर जाकिर शेख, समिर जाकिर शेख, अस्लमभाई यांच्या मालकीचा होता.
Tags:
Ahmednagar