'आप'ची मुसंडी, भाजपची पिछाडी, केजरीवालांची पुन्हा आघाडी
दिल्लीकरांनी मोदींचं ऐकलं, देशद्रोही भाजपला नाकारलं: नवाब मलिक
आपची बंपर बहुमताकडे वाटचाल, मात्र जागा झाल्या कमी
नवी दिल्ली (दि.11) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देताना दिल्लीकरांनी देशद्रोही भाजपाला नाकारलं असल्याचं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशद्रोह्यांना मतदान करु नका असं म्हटलं होतं. दिल्लीच्या जनतेने ते ऐकलं असून भाजपाला नाकारलं आहे असा टोला नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. आज दिल्ली विधानसभा निवडणुकीत संपत्ती, शक्ती आणि विरोध पराभूत होऊन विकास आणि विश्वास जिंकल्याचे नवाब मलिक म्हणाले आहेत.
दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांपैकी 50 पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेत, ‘आप’ने पुन्हा दिल्लीवर झेंडा फडकावला आहे. अरविंद केजरीवाल हे हॅटट्रिक करत, तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार हे जवळपास निश्चित आहे. दुसरीकडे ‘आप’कडून सत्ता खेचून आणण्यात भाजपला अपयश आलं आहे. तर काँग्रेसचा पुन्हा सुपडासाफ झाला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणूक निकालाचे प्राथमिक कल पाहता मतदारांनी पुन्हा एकदा आम आदमी पक्षाच्या बाजुने कौल दिल्याचं समोर आलं आहे. यात 'आप'ला ५३ तर भाजपला १७ जागांवर आघाडी मिळाली असल्याचं चित्र आहे. आम आदमी पक्षाने बहुमत गाठल्याने दिल्लीत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषालाही सुरुवात केली आहे. भाजप पदरी अपयश पडल्यानंतर विरोधकांनी भाजपवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे.
आपचं सरकार येणार
दिल्ली विधानसभेच्या ७० पैकी ५० हून जास्त जागांवर आप आघाडीवर आहे. यामुळे अरविंद केजरीवाल हॅटट्रिक करणार असल्याचं जवळपास निश्चित असून दिल्लीत पुन्हा आपचं सरकार येणार असल्याचं चित्र आहे. आपची बहुमताकडे वाटचाल, मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या जागांच्या तुलनेत यंदा जागा झाल्या कमी
आमच्या जागा 6 पटींपेक्षा जास्त वाढल्या
दिल्लीत भाजप 3 जागांवरुन 20 पर्यंत पोहोचली, आम्हाला सत्तास्थापन करण्याइतपत जागा नाहीत, मात्र आमच्या जागा 6 पटींपेक्षा जास्त वाढल्या : सुधीर मुनगंटीवार
२०१५ मधील दिल्ली विधानसभेतील पक्षीय बलाबल
आप – ६७
भाजप – ०३
काँग्रेस – ००
एकूण – ७०
आप – ६७
भाजप – ०३
काँग्रेस – ००
एकूण – ७०
Tags:
Maharashtra