राधाबाई काळे महिला महाविद्यालयात पदवी ग्रहण समारंभ

 
 
राधाबाई काळे महिला महाविद्यालयातील १४६ विद्यार्थीनीनी केली
शानदार समारंभात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पदवी ग्रहण


नगर (दि.06) : सध्याच्या युगात पदवीसाठी अभ्यास करणे पुरेसे नसून जर आपल्याला रोजगाराभिमुख  शिक्षणाची आवश्यकता आहे. त्यासाठी शैक्षणिक व्यवस्थेत गुणात्मक सुधारणा होणे गरजेचे असून स्वयंरोजगारावर लक्ष्य द्या असे आवाहन रयतच्या उत्तर विभागाच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांनी केले ते येथील राधाबाई काळे महिला महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पद्वीग्रहण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी सुमारे १४६ स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. भाऊसाहेब औटी होते. 

     यावेळी माजी प्राचार्य डॉ. विश्वासराव काळे यांचे भाषण झाले. तेव्हा ते म्हणाले की, शिक्षणातून जीवनाकडे सकारात्मकतेने पाहिले पाहिजे. मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग व्यवहारात करून जीवन समृध्दपणे जगता यायला हवे. यासाठी विद्यापीठाची पदवी महत्वाची आहे. मा.ज्ञानदेव पांडुळे यांनी जुनी शिक्षण पध्दती कशी कालबाह्य झाली आहे हे सांगून उपयुक्त शिक्षण पद्धतीवर संशोधनाची गरज व्यक्त केली. कु. रितुताई ॲबट यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. त्यांनी परदेशातील शिक्षण आणि भारतीय शिक्षण यांची तुलना करून विद्यार्थीनीनी अष्टपैलू बनण्यासाठी सतत ज्ञानग्रहण केले पाहिजे असे प्रतिपादन केले. 

       कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. मनोहर करांडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.सतीश शिर्के, डॉ. योगिता रांधवणे, डॉ. रविप्रकाश ठोंबरे यांनी केले. शेवटी महाविद्यालय परीक्षा अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांनी आभार मानले. यावेळी रयतच्या सल्लागार समितीचे सदस्य अशोक बाबर, डॉ. अनिल कापरे पदवीप्राप्त विद्यार्थीनी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.      

Post a Comment

Previous Post Next Post