कै.बाळासाहेब देशपांडे रुग्णालयातील डॉक्टर कर्मचारी निलंबित करा : अभिमन्यू जाधव यांची मागणी
नगर (दि.08) : महापालिकेच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालय मध्ये चाललेला सावळा गोंधळामुळे तसेच डॉक्टरसह कर्मचार्यांच्या कामचुकारपणामुळे रुग्णांनाच फटका बसत आहे. तसेच रक्तपेढी गेल्या दीड वर्षापासून कागदावरच दिसत आहे. त्यामुळे कर्मचारी बसून पगार घेत असल्याचे निवेदन अभिमन्यू जाधव यांनी मनपा उपआयुक्त पठारे यांच्याकडे दिले.

यावेळी गणेश पुट्टा, सागर नरसाळे, किशोर उदगीरकर उपस्थित होते. सामान्य
नागरिकांसाठी महापालिकेचे शहराच्या मध्यवस्तीत असलेले कै. बाळासाहेब
देशपांडे रुग्णालय हे प्रसूतीसाठी शहरातच नव्हे तर जिल्हाभरत नावाजलेले
रुग्णालय आहे. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील महिला प्रसूतीसाठी याच
रुग्णालयात दाखल होत असतात. मात्र या रुग्णालयाचा असलेल्या लौकिकला तेथील
डॉक्टर व कर्मचारी यांच्याकडून बाधा पोहोचविण्याचे काम सध्या सुरु आहे. या
रुग्णालयात दाखल होणाऱ्या महिला रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होते.
रुग्णालयातील अधिकारी - कर्मचाऱ्यांचा या मनमानी कारभारामुळे सर्वसामान्य
नागरिकांच्या जीवावर बेतत आहे. त्यामुळे या रुग्णालयाच्या कारभाराविषयी
मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत आहेत. काही दिवसांपूर्वीच प्रसूतीसाठी
आलेल्या महिलेला नातेवाईकाला हातावर उचलून न्यावे लागले हे दुर्देवच.
तसेच या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाच्या तीसऱ्या मजल्यावर असलेली
महापालिकेची रक्तपेढी शहरातील सर्वात जुनी व नावाजलेली रक्तपेढी आहे. या
रक्तपेढीत इतर रक्तपेढयांपेक्षा अतिशय वाजवी दरात सर्वसामान्य रुग्णांना
रक्त उपलब्ध करून दिले जात होते. मात्र गेल्या काही वर्षात या रक्तपेढीकडे
महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने आता हि रक्तपेढी नावालाच उरलेली
असून वेळेवर एक थेंब रक्त रुग्णांना मिळत नाही.
Tags:
Ahmednagar