विठू माउली, तुकोबांच्या दर्शनाला कशाला परवानगी हवी


विठू, माउली, तुकोबांच्या दर्शनाला कशाला परवानगी हवी
आळंदीत शरद पवारांचा अप्रत्यक्षपणे राष्ट्रीय वारकरी परिषदेला टोला

आळंदी (दि.08) विठ्ठलाच्या, माउलींच्या आणि तुकोबांच्या दर्शनाला जायचे असेल तर कोणाची परवानगी घ्यावी लागत नाही. त्यामुळे कोणी सांगितले की, तुम्हाला परवानगी नाही. तर त्यांना वारकरी संप्रदायाचा विचारच समजला नाही. सच्चा वारकरी अशी भूमिका कधी घेणार नाही.

पुढे पवार म्हणाले की, त्यामुळे मी फारसे लक्ष देत नाही असा खोचक टोला माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाव न घेता राष्ट्रीय वारकरी परिषदेला लगावला आहे. लहान लहान गोष्टी या होत असतात. त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे असते. आपल्याला जो रस्ता योग्य वाटतो त्या रस्त्यावर प्रामाणिकपणे जायचे असते. तिथे बांधिलकी ठेवायची असते. त्याच्याशी कधीच तडजोड करायची नसते, आज  मी  आळंदीला आलो आहे, कोणताही हेतु मनात न ठेवता असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Post a Comment

Previous Post Next Post