अवकाळीप्रमाणे अक्षांश-रेखांशासह पंचनामे करण्याची मागणी
पीककापणी व वजनाचे चित्रीकरण करून
पीकविम्यातील गैरकारभार टाळा: सुधीर भद्रे
पीककापणी व वजनाचे चित्रीकरण करून
पीकविम्यातील गैरकारभार टाळा: सुधीर भद्रे
नगर (दि.06) : शेतकर्यांच्या पीक नुकसानीचे पंचनामे अक्षांश रेखांशासह केले जातात. त्याच धरतीवर पीककापणी धान्य वजनाचे चित्रीकरण करुन पीकविम्यातील गैरकारभार टाळावा अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे सुधीर भद्रे यांनी केली आहे.
त्यांनी म्हंटले आहे की, पिक विमा कंपन्या या ईस्ट इंडिया कंपनीपेक्षाही खतरनाक असल्याची शेतकर्यांची भावना झाली आहे. कारण म्हणजे पिक विका कंपन्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजना सुरु झाल्यापासून कोट्यावधी रुपयांचा गल्ला जमवुन नगण्य रुपयांचे केलेल्या वाटपामुळे पिक विमा कंपन्या या लुटारु असल्याचे त्यांनी स्वतःच सिध्द केले आहे. यासाठी हमी भाव व पिक विमा या दोन गोष्टी बाबींवर शासन आणि प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
शेतकर्यांना भरपुर पीक झाल्यानंतर हमीभाव मिळाला आणि कमी पिक झाल्यानंतर पिक विम्याद्वारे भरपाई तर शेतकर्यांच्या आत्महत्या नक्कीच रोखता येतील अशी खात्री सुधीर भद्रे यांनी दिली आहे.
नुकतेच खरीप हंगाम 2019 मध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या पिक नुकसानीचे पंचनामे करताना महसुल व कृषी विभागाने मोबाईलवर व्हिडीओ शुटींग करुन केले आहेत. यामध्ये अक्षांश, रेखांश चित्रित केले जातात, म्हणजे त्याच शेतकर्यांच्या शेतात तेच पिक होते हे पुराव्यानिशी सिध्द होते. तशाच प्रकारे पिक कापणी प्रयोग करतेवेळी संपूर्ण प्रक्रियेची शुटिंग करण्यात यावी.
तसेच शेतकर्यांना सुध्दा तक्ता नं.2 भरताना वजन बरोबर आहे की जास्त लिहले जात आहे हे बारकाईने पहावे अशी विनंती अॅड.कारभारी गवळी, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे राज्य सचिव अशोक सब्बन, कैलास पठारे, अशोक ढगे, वीर बहादुर, प्रजापती अशोकराव कोकाटे, कैलास खांदवे, गणेश इंगळे, विलासा खांदवे, व जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
Tags:
Ahmednagar