सातारा (दि.11) : भाजपाचे नेते
आणि साताऱ्याचे माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या एका चाहत्याने
देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना रक्ताने पत्र लिहिले आहे. उदयनराजे भोसले
यांना राज्यसभेवर घेऊन मंत्रिपद द्या, अशी मागणी त्या चाहत्याने रक्ताने
पत्र लिहून केली आहे. विशेष म्हणजे (१० फेब्रुवारी)ला निलेशचा वाढदिवसही
होता.
निलेश याने लिहलेल्या पत्रात म्हटले आहे
की, “मी निलेश सुर्यकांत जाधव आपणास सांगू इच्छितो की, श्रीमंत छत्रपती
उदयनराजे भोसले (महाराज साहेब) यांना राज्यसभेवर खासदार करुन मंत्रीपद
मिळावे आणि छत्रपतींच्या गादीचा सन्मान करावा अशी विनंती करतो.
दरम्यान, उदयनराजे भोसले यांच्या २४
फेब्रुवारी या वाढदिवसाच्या दिवशी भाजपाकडून गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून भाजपाकडून त्यांना
राज्यसभेवर घेण्याची आणि मंत्रिपद देण्याची घोषणा होणार आहे. यासाठी माजी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आग्रही भूमिका घेत केंद्रीय गृहमंत्री
अमित शहा यांच्याशी चर्चा केली आहे. सातारा लोकसभा निवडणुकीतील पराभवाची
भरपाई करताना उदयनराजे भोसले यांना राज्यसभेवर घेऊन त्यांना मंत्रिपद
देण्याचा शब्द खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिला आहे.
Tags:
Maharashtra