नगर (दि.09) : कोल्हापूर येथील अविज पब्लीकेशन वतीने दरवर्षी राज्यातील पतसंस्थांना उल्लेखनीय कार्याबद्दल देण्यात येणार्या बँको पतसंस्था पुरस्कार यंदाच्यावर्षी येथील अहमदनगर पोस्टल डिव्हीजन को ऑप क्रेडीट सोसायटीला माजी केंद्रीय मंत्री व गोवा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा.खा. रमाकांत खलप यांच्या हस्ते संस्थेचे चेअरमन दत्तात्रय जासूद, सेक्रेटरी प्रफुल्लकुमार काळे, अमित कोरडे, व नितीन वाघ यांच्याकडे सुपुर्त करण्यात आला. यावेळी बँकों मासिकाचे संपादक अविनाश गुंडाळे उपस्थित होते.
कोल्हापूर येथील अविज पब्लीकेशनच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा पुरस्कार हा राज्यातील पतसंस्थांना उल्लेखनीय कार्याबद्दल देण्यात येत असतो. यंदाच्यावर्षीचा पुरस्कार सोहळा नुकताच गोवा येथील रिओ रिसॉर्ट येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी 150 संस्थांचे पदाधिकारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्यपुर्व काळात स्थापन झालेल्या या संस्थेस यावर्षी 100 वर्ष पुर्ण होत असून संस्थेस प्रथमच राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सभासदांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
या यशाबद्दल सभासद सुनिल भागवत, प्रमोद कदम, देवेंद्र शिंदे, किशोर नेमाणे, महेश तामटे, निसार शेख, रामेश्वर ढाकणे, दिलीप खरात, बलराम दाते, आनंद भोंडवे, दिपक जसवाणी, सुनील कुलकर्णी, संतु नरवडे, अरविंद वालझाडे, महंमद शेख, सचिन अस्वर, विजय कोल्हे, महेश दांगट, दिलीप खरात, इरफान पठाण, बळी जायभाय आदींनी अभिनंदन केले आहे.
Tags:
Ahmednagar