महिन्याभरात नगरला नवीन एसपी : पालकमंत्री



पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची भाजप युवा मोर्चाचे प्रदेश खजिनदार तुषार पोटे यांना ग्वाही

नगर (दि.07) : जिल्ह्याला जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच महापालिकेला कायमस्वरुपी आयुक्तांची नियुक्त तातडीने करावी अन्यथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर लोटांगण आंदोलन करण्याचा इशारा भाजप युवा मोर्चाचे प्रदेश खजिनदार तुषार पोटे निवेदनाद्वारे दिला होता. त्यानंतर मुंबई येथे पालकमंत्री मुश्रीफ यांनी पोटे यांना रेग्युलर पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्यांमध्ये नगर जिल्ह्याला जिल्हा पोलीस अधीक्षक रुजू होईल. तसेच महानगरपालिकेत आयुक्त लवकरात लवकर दिला जाईल असे आश्‍वासन त्यांनी दिले.

मुंबईत पालकमंत्री मुश्रीफ यांच्या दालनात तुषार पोटे लोटागंण आंदोलनासाठी गेले. ना. मुश्रीफ यांनी तुम्हाला आंदोलन करण्याची गरज नाही असे सांगून नगर जिल्ह्याला लवकरच जिल्हा पोलीस अधीक्षक आणि महानगरपालिकेला आयुक्त मिळणार असल्याची ग्वाही दिली. तसेच नगर शहराच्या विकासासाठी मोठा निधी देणार असल्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. शहरासह जिल्ह्यात महत्त्वाचे असलेले प्रमुख अधिकारी प्रभारी म्हणून काम पाहत आहेत.

अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून जिल्हाधिकारी कामकाज पाहतात. महानगरपालिका व राज्यात सर्वाधिक क्षेत्रफळ असलेल्या जिल्ह्याचा कामकाज मोठ्या प्रमाणात असल्याने जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रभारी आयुक्तांचा कार्यभार आहे. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक इशू सिंधू हे प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातून परदेशात गेल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांचा पदभार सध्या जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्याकडे देण्यात आला आहे.

शहरासह जिल्ह्यात अवैध धंद्यासह खून, मारामार्‍या, वाळूतस्करी, माहिला अत्याचार, महिलांचे गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरी, लुटमारसह अन्य घटना मोठ्या प्रमाणात घडत आहे. गेल्या महिन्यापासून नगर जिल्ह्याला जिल्हा पोलीस अधीक्षकपद हे प्रभारी आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक आणि महापालिकेचे आयुक्त यांची तातडीने नयुक्ती करावी अन्यथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्यासमोर लोटागंण आंदोलन करणार असल्याचे निवेदन भाजप युवा मोर्चाचे प्रदेश खजिनदार तुषार पोटे ना. मुश्रीफ यांना दिले. मुंबई येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पोटे यांना जिल्हा पोलीस अधीक्षक आणि महानगरपालिकेला आयुक्त पूर्ण वेळ लवकरच रुजू होतील असे आश्‍वासन दिले.

Post a Comment

Previous Post Next Post