राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परिक्षेत रेसिडेन्शिअलचे विद्यार्थी राज्यात प्रथम


नगर (दि.09 ) : अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे  रेसिडेन्शिअल हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय भुगोल प्रज्ञाशोध परिक्षेत भरघोस यश संपादन केले. नोव्हेंबर 2029 मध्ये झालेल्या परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असनू, यात इ.9 वी मधील संस्कृती ढगे, शिवम वाघ या दोन विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण मिळवून राज्यात प्रथम येण्याचा मान मिळविल्या. तसेच अर्णव खळेकर (इ.6वी), निकिता जपे (इ.10वी) हे दोघे राज्यात द्वितीय आले विद्यालयाचा 88 टक्के निकाल लागला. याच परिक्षेच्या माध्यमातून भुगोल प्रज्ञाशोध केंद्रामार्फत विद्यालयातील शिक्षक योगेश मोरे यांना ‘उपक्रमशील शिक्षक’ हा पुरस्कार देण्यात आला.

     या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा संस्थेचे सचिव जी.डी.खानदेशे, पर्यवेक्षक आर.बी.भापकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य ए.आर.दोडके, उपमुख्याध्यापक बी.के.सुर्वे, पर्यवेक्षक बी.के.मोटे, श्रीमती टी.डी.नलगे व शिक्षक उपस्थित होते.

     सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे, उपाध्यक्ष रा.ह.दरे, सहसचिव अ‍ॅड.विश्‍वासराव आठरे, खजिनदार डॉ.विवेक भापकर तसेच पदाधिकार्‍यांनी अभिनंदन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सामाजिक शास्त्र विषयाच्या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post