नगर (दि.05) : राज्य निवडणूक आयोगाने अहमदनगर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 6 (अ) च्या पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आली असून पोटनिवडणूक दिनांक 6 फेब्रुवारी 2020 रोजी मतदान व दिनांक 7 फेब्रुवारी 2020 रोजी मतमोजणी होणार आहे. महानगरपालिकेमध्ये दिनांक 6 फेब्रुवारी 2020 रोजी घेण्यात येणा-या मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी दोन तासांची सवलत जाहिर केली आहे.
अहमदनगर महानगरपालिका पोट निवडणूक 2020 साठी प्रभाग क्रमांक 6 (अ) मधील मतदारांना ते काम करीत असलेल्या विविध अस्थापना, दुकाने , निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाटयगृहे, व्यापर, औद्योगिक उपक्रम, इतर आस्थपना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, विविध कंपन्या, शॉपिंग, सेंटर्स, मॉल्स, रिटेलर्स इत्यादी आस्थापनावरील कामगारांना या निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्यांच्या कामाचा तासामधून मतदान करण्यांकरिता त्यांना दोन तासांची सवलत जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या आदेशान्वये देण्यात आली आहे.
Tags:
Ahmednagar