भूईकोट किल्ल्याजवळ दोन वाहणांचा अपघात

नगर (दि.04) : भिंगार रोडवरील भूईकोट किल्ला परिसरामध्ये  भरधाव होंडा सिटी कारने ओव्हटेक करताना समोरून येणार्‍रा कारला जोराची धडक दिल्याने कारमधील दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. रविवारी (दि. 2) रोजी हा अपघात झाला. कारचालकाने दिलेल्या फिर्यादीवरून कॅम्प पोलिसात होंडा सिटी कारचालकाविरुद्ध अपघातास कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत कमलेश्‍वर पुरुषोत्तम खैरनार (वय 25, रा. हडपसर पुणे) यांनी फिर्याद दिली. कमलेश्‍वर खैरनार हे मित्राच्या बहिणीच्या साखरपुड्यासाठी रविवारी सकाळी पुण्याहून नगरला आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास ते सारसनगरहून मित्राचे वडील राजेंद्र नामदेव म्हेत्रे यांच्या मालकीच्या मारुतीसुझुकी ब्रेंझा कारमधून (एमएच 16 बीझेड 1618) मित्राच्या चुलत्याला भेटायला भिंगारला निघाले. त्यांच्यासमवेत मित्र संकेत गंगाधर माने, ज्योती गंगाधर माने, आवडाबाई रंगनाथ माने व कोमल सुरेशराव कपाटे (सर्व रा. पुणे) हे चौघेजण होते.

दरम्यान, कमलेश्‍वर खैरनार हे कार चालवत होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास भूईकोट किल्ल्याजवळील वळणावर समोरून ओव्हटेक करून येणार्‍रा भरधाव येणार्‍रा होंडा सिटी कारने (एमएच 16 बीएच 4158) त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. एअर बॅग उघडल्यामुळे पुढच्या लोकांना इजा झाली नाही. मात्र, मागील दोन महिलांना आदळून डोक्याला व पायाला मार लागला. अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान होऊन दुसर्या कारमधील व्यक्तीही जखमी झाल्या. जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post