मनपा प्रशासनाकडून तातडीने दखल
जयभीम हौसिंग सोसायटीत नव्याने ड्रेनेजलाईन टाकण्याचे काम सुरू
नगर (दि.09) : शहरातल्या जयभीम हौसिंग सोसायटी, रेल्वे स्टेशन, नगर येथे पाचशे लोकांची लोकवस्ती आहे. ही सोसायटी रेल्वेच्या जागेलगत आहे. सोसायटीच्या या जागेत ड्रेनेजलाईनचे काम रेल्वेने सुरु केल्याने जेसीबीने ड्रेनेजलाईन संपूर्ण तुटल्या जाऊन उद्ध्वस्त झाल्या. याप्रश्नी नव्याने ड्रेनेजलाईन टाकावी, या मागणीचे निवेदन उपायुक्त पठारे यांना माजी नगरसेवक विजय गव्हाळे आणि स्थानिक नागरिकांनी दिले होते. तसेच याबाबत आ. संग्राम जगताप यांनीही लक्ष घालून तातडीने प्रश्न सोडविण्यासंदर्भात प्रशासनाशी चर्चा करुन यासाठी पाठपुरावा केला. अखेर हा प्रश्न मार्गी लागला आहे. नव्याने ड्रेनेजलाईन टाकण्याचे काम सुरु करण्यात आल्याने स्थानिक नागरिकांनी आ. संग्राम जगताप, माजी नगरसेवक गव्हाळे आणि मनपा प्रशासनास धन्यवाद दिले आहेत.
यावेळी माजी नगरसेवक विजय गव्हाळे, वसंत गवारे, बावडे, अण्णा कजबे, विनायक मेढे, एकनाथ रणदिवे, लांडगे सर, दीपक भालेराव, अजय कोतकर, निखिल मेढे, मनोज पंचमुख, महेश आठवले, अविनाश लोंढे, अनिल भिंगारदिवे, गणेश डुलगज, प्रशांत ठोंबरे, संजय पंचमुख, सारंग पटेकर, अण्णा गायकवाड, सचिन जाधव, पार्वती घोडके, लता लांडगे, सुनीता मेढे, अनुराधा मेढे, रेखा तिजोरे, चंद्रभागा पंचमुख, लिलाबाई गायकवाड, पार्वती पंचमुख, मीरा कदम, आशा जाधव, सुरेखा पंचमुख, वाघमारे, इंदुमती गवारे, जया पगारे, वैशाली जोगदंड, मंजुश्री भालेराव, संगीता कांबळे आदींसह नागरिक व महिला उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना गव्हाळे म्हणाले, ‘आ. जगताप यांनी या प्रश्नी लक्ष घातल्याबद्दल नागरिकांच्यावतीने मी त्यांना धन्यवाद देतो. ड्रेनेज तोडल्यामुळे संस्थेत व परिसरात सर्वत्र गटारीचे घाण पाणी साठले होते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊन त्यांचे आरोग्य धोक्यात आले होते. ड्रेनेजलाईन फुटल्याने सर्वत्र घाण पाणी झाले होते. नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणअयाची परिस्थिती उद्भवल्याने ही बाब अत्यावश्यक सेवा असल्याने नागरिकांना तातडीने सुविधा पुरविणे गरजेचे होते. याप्रश्नी तातडीने कारवाई होऊन काम सुरु झाले, हे समाधानकारक झाले’.

Tags:
Ahmednagar