विद्यार्थ्यांनी कायद्याच्या अभ्यासाबरोबर समाज प्रबोधन करावे : न्यायाधीश आणेकर

 
 
विद्यार्थ्यांनी कायद्याच्या अभ्यासाबरोबर समाज प्रबोधन करावे : न्यायाधीश आणेकर

नगर ( दि.10) : न्यू लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी कायद्याचा अभ्यास करत असताना स्वतः बरोबर समाजातील दूर्लक्षित व वंचित घटकांनाही कायदे विषयक हक्क व अधिकाराबाबतचे ज्ञान दिले पाहिजे. त्याच उद्देशाने कायद्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी हे प्रदर्शन नक्कीच मोलाचे काम करेल असे प्रतिपादन प्रधान जिल्हा  व सत्र न्यायाधीश श्रीकांतजी आणेकर यांनी केले.


अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारण समाजाचे न्यू लॉ कॉलेज येथे सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त न्यू आटर्स कॉमर्स अ‍ॅन्ड सायन्स कॉलेज, अहमदनगर येथे कायद्येविषयक जनजागृती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सचिव जी डी खानदेशी, सहसचिव व्ही डी आठरेपाटील, उपाध्यक्ष रामचंद्रजी दरे, उपमहापौर शालनताई ढोणे, ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. सुभाष भोर ,प्राचार्य एमएम तांबे  व  सर्व विभागाचे प्रमुख व न्यू लॉ कॉलेजचे विद्यार्थी- विद्यार्थींनी  उपस्थित होते.
 

सचिव श्री खानदेशी यांनी जिल्हा मराठा विद्या प्रसारण संस्था  स्थापनेची माहिती देवून  कायदेविषयक प्रचार व प्रसार प्रदर्शनात सहभागी झालेल्या सर्व शासकीय विभाग व स्वंयसेवी संस्थांना धन्यवाद देवून समाजामध्ये विधी जागरुकतेच्या  या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

या प्रदर्शनामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विभाग, महसूल विभाग, वनविभाग, उप प्रादेशिक परिवहन विभाग, वाहतूक नियंत्रक / वाहतूक सुरक्षा विभाग, दिलास सेल, महिला व बालकल्याण विभाग, स्नेहालय, न्यायाधार असे विविध शासकीय व सेवाभावी संस्था सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. प्रियंका खुळे यांनी काम पाहिले.

या कार्यक्रमाच्या अतिथींचे स्वागत प्राचार्य एम एम तांबे यांनी केले तर सूत्रसंचालन  प्रा.प्रियांका खुळे  यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post