कचरे यांच्या ‘पुरोगामी’ आघाडीचा सलग चौथ्यांदा झेंडा फडकला

माध्यमिक शिक्षक सोसायटी निवडणूक : 
विरोधी परिवर्तनला केवळ चार जागा : सत्ताधाऱ्यांचा ‘पारदर्शी’ कारभार भावला  

कचरे यांच्या ‘पुरोगामी’ आघाडीचा सलग चौथ्यांदा झेंडा फडकला

नगर (दि.11): जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांची आर्थिक कामधेनु असणाऱ्या माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सत्ताधारी पुरोगामी सहकार आघाडीने २१ पैकी १७ जागा जिंकत सलग चौथ्यांदा आपला झेंडा फडकवला.तर विरोधी परिवर्तन आघाडीला केवळ चार जागा मिळाल्या.तिसऱ्या आघाडीचे पूर्ण पानिपत झाले.सत्ताधार्यांच्या पारदर्शी कारभाराला मतदारांनी पुन्हा कौल देत विरोधकांनी त्यांच्यावर केलेले गैरव्यवहाराचे आरोप नाकारले.

माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या संचालक मंडळाच्या २१ जागेसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज शहरात पार पडली.निवडणुकीसाठी प्रा.भाऊसाहेब कचरे यांच्या नेतृत्वाखालील पुरोगामी सहकार आघाडी,आप्पासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन आघाडी तर सुनील पंडीत यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा आघाडी रिंगणात होती.सोसायटीत गेल्या १७ वर्षापासून कचरे यांच्या पुरोगामी आघाडीची सत्ता आहे.यावेळीहि त्यांनी २१ पैकी १७ जागा जिंकत सलग चौथ्यांदा बाजी मारली.तर विरोधी आघाडीचे केवळ चार शिक्षक नेते निवडून आले.

कचरे यांनी प्रचारात पारदर्शी,दूरदर्शी कारभाराचा प्रचार करत संस्थेच्या कल्याणकारी निर्णयावर जोर दिला. सभासदांच्या आर्थिक हिताचे गणिते मांडत त्यांनी पुन्हा मतदारांकडे सत्ता मागितली.तर विरोधी परिवर्तन आघाडीने संस्थेतील गैरकारभाराबाबत रान उठवले.तिसऱ्या आघाडीकडे मुद्धे नसल्याने मतदारांनी त्यांना सपशेल नाकारले.कचरे यांनी सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा मान मिळवला.त्यांच्याखालोखाल शिक्षक नेते आप्पासाहेब शिंदे यांना मते मिळाली,विशेष म्हणजे शिंदे विरोधी आघाडीचे उमेदवार असूनही त्यांना मतदारांनी दोन क्रमांकाची मते दिली.विरोधी आघाडीतील काही उमेदवार थोड्या फरकाने पराभूत झाले.

विजयी उमेदवार : पुरोगामी सर्वसाधारण - 
रा.भाऊसाहेब कचरे - (५३५८), दिलीप काटे - (४५७६),ज्ञानेश्वर काळे - (४४८३), संजय कोळसे - (४३७७), चांगदेव खेमनर - (४६७९), अनिल गायकर - (४२४८), काकासाहेब घुले - (४४५६), अशोक ठुबे - (४४१८), सुर्यकांत डावखर - (४३८७),अण्णासाहेब ढगे - (४१३५), सत्यवान थोरे - (४३०४), धनंजय म्हस्के - (४७१२), सुरेश मिसाळ - (४४०४), कैलास राहणे - (४१६४), महिला –आशा कराळे - (४७८५),मनीषा म्हस्के - (४५८३) -अनुसूचित- धोंडीबा राक्षे (४३८४)

परिवर्तन – सर्वसाधारण –आप्पासाहेब शिंदे - (५१००),बाबासाहेब बोडखे - (४२००),,-ओबीसी - हेंद्र हिंगे - (४७५२) - भटक्या विमुक्त - वसंत खेडकर- (४३८४)

Post a Comment

Previous Post Next Post