नगर (दि.06) :लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या पारनेर तालुक्यातील पिपळगावरोठा येथील ब वर्ग तीर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानचा दि. ९ फेबु ला माघी पौर्णिमा (नव्याची पौर्णिमा) उत्सव पारंपरिक पद्धतीने रितीरीवाज, कुलधर्म, कुलाचार, जागरण, गोंधळ विधी,खोबरे भंडारा, तळीभंडार करून साजरा करण्यात येणार आहे .
या माघी पौर्णिमेला नव्याची पौर्णिमा म्हणूनही शेतकरी वर्गात विशेष धार्मिक महत्व आहे.शेतातून नवीन झालेल्या धान्याच्या राशी घरात येतात.म्हणून या नवीन धान्यापासून बनविलेले पिठाचे दिवे तयार करून मंदिरात अर्पण करतात तसेच शेतकरी नवीन झालेल्या धान्याचा काही अंश प्रसाद म्हणून मंदिरात अर्पण करतात,पुरणपोळीचा नैवद्य करून देवाला अर्पण करण्याची परंपरा या पौर्णिमेला जोपासली जाते व सर्वत्र आनंद व भक्तीचा उत्साह भरलेला असतो .
रविवार दि. ९ फेबु ला पौर्णिमेला सकाळी ६ वा श्री खंडोबा मंगलस्नान, साजशृंगार,अभिषेक पुजा होऊन सकाळी ८ वा महाआरती होईल. सकाळी ९ वा देवाच्या उत्सव मूर्तीची चांदीच्या पालखीतून प्रदक्षिणा मिरवणूक ढोल ताश्याच्या,लेझीमच्या तालावर निघेल.भाविक भक्ताचे पालखी दर्शन व ओलांडा दर्शन,लंगर तोडणे,नैवैद्य हे धार्मिक विधी होऊन पालखी मंदिरात परत येईल .
सकाळी ११ वाजल्यापासून जय मल्हार सेवा मंडळ,भोरवाडी ता जुन्नर यांचे तर्फे पौर्णिमेचा महाप्रसाद वाटप होईल.या पौर्णिमेचा पर्वकाळ रविवार तसेच शेतकरी मोठ्या संख्नेने येणार असल्याने भाविक भक्तांची मोठी गर्दी होईल असा अंदाज धरून देवस्थानतर्फे दर्शन व्यवस्था,वाहने पार्किंग,पिण्याचे पाणी,महाप्रसाद असे नियोजन आहे.सर्व भाविक भक्तानी उत्सव पर्वणी व देवदर्शन पालखी सोहळा,महाप्रसाद व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे निवेदन देवस्थान तर्फे एड पांडुरंग गायकवाड उपाध्यक्ष गंगाराम बेलकर,सरचिटणीस महेन्द्र नरड,चिटणीस सौ. मनिषा जगदाळे, खजिनदार हनुमंत सुपेकर ,विश्वस्त किसन मुंढे, अश्विनी थोरात,चंद्रभान ठुबे,मोहन घनदाट, अमर गुंजाळ,किसन धुमाळ,बन्सी ढोमे,दिलीप घोडके, साहिबा गुंजाळ ,देविदास क्षीरसागर सर्व माजी विश्वस्त,ग्रामस्थ,भक्तगण यांनी केले आहे

Tags:
Ahmednagar