हमाल पंचायतीच्यावतीने पोपटराव पवार यांचा सत्कार
‘पद्मश्री’ पुरस्काराने पोपटराव पवारांच्या कार्यावर मोहर : अविनाश घुले
नगर (दि 10) : शेवटच्या घटकांचा विचार करुन कार्य करणार्या कार्यकर्त्यांची आज समाजाला गरज आहे. देशाची अर्थव्यवस्था आणि एकंदरीत जीवनमान हे शेतीवरच अवलंबून असल्याने शासकीय पातळीबरोबरच सामाजिक दायित्व जपणार्यांनी या घटकासाठी काम केले पाहिजे. शेती आणि शेतकरी जगला पाहिजे, हीच तळमळ पोपटराव पवारांनी ओळखून पर्यावरण आणि पाणी या विषयी जनजागृती करुन आधी आपले गाव पाणीदार करुन दाखवून राज्य व देशासमोर एक आदर्श ठेवला. त्यांच्या कार्याने व प्रयत्नाने आज राज्यातील व देशातील अनेक गावे पाणीदार व स्वयंपूर्ण झाले आहेत. त्यांच्या कार्याची दखल देशासह जगाने घेतलीच आहेच; परंतु आता जाहीर झालेल्या पद्मश्री पुरस्कारामुळे त्यावर मोहर उमटली आहे, असे प्रतिपादन जिल्हा हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी केले.
अहमदनगर जिल्हा हमाल पंचायतीच्यावतीने पोपटराव पवार यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा अध्यक्ष अविनाश घुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपाध्यक्ष गोविंदराव सांगळे, शेख रज्जाक शेखलाल, सल्लागार विष्णूपंत म्हस्के, बंट्टी गुंजाळ, संजय महापूरे, अनुरथ कदम, मंदा सूर्यवंशी, सुनिल गीते, तारकराम झावरे, दत्ता वामन, लतिफ भाई, नवनाथ बडे आदि उपस्थित होते.
सत्कारास उत्तर देतांना पोपटराव पवार म्हणाले, पाणी ही आज जागतिक समस्या बनू पाहत आहे. देशात तसेच राज्यातही निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीच्या उत्पादनात घट होत आहे; शेतकरी आत्महत्या करीत आहे. यासाठी शाश्वत पाणी मिळविण्यासाठी शासन व गावकर्यांनी एकत्रित प्रयत्न करुन शेती फुलविली पाहिजे. त्याबरोबर शेतमालाही योग्य भाव मिळाला पाहिजे. तेव्हाच शेतकर्यांच्या आत्महत्या थांबतील. शेतकरी व कष्टकरी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यांच्या प्रश्नांसाठीच जिल्हा हमाल पंचायतीचे माजी अध्यक्ष स्व.शंकरराव घुले यांनी आपले आयुष्य वेचले. त्यांच्यामुळेच हमाल-मापाड्यांचे अनेक प्रश्न सुटले आहेत. कष्टकार्यांचा सत्कार मला मार्गदर्शक ठरेल, असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय महापुरे यांनी केले तर आभार गोविंद सांगळे यांनी मानले. यावेळी नारायण गिते, तबाजी कार्ले, सागर भांड, अर्जुन शिंदे, अरुण गोंडाळ, जयदेव कांडेकर, अशोक गवळी, बळी शेंडे, राजू चोरमले आदिंसह हमाल-मापाडी उपस्थित होते.

Tags:
Ahmednagar