नगर (दि.05) : काही महिन्यांपासून सर्वसामान्यांना रडवणारा कांदा आता शेतकर्यांना रडवत आहे. दोन दिवसांत कांद्याच्या दरामध्ये तब्बल सहाशे रुपयाची घसरण झाली आहे. ऐतिहासिक भावाची मजल मारणारा कांदा आता मातीमोल भावाने विक्री होत असल्याने शेतकरी पूर्णत: हतबल झाला आहे. शेतकर्यांना रडवणार्या कांद्याचे दर गडगडले असून कांदा प्रतिक्विंटल दोन-अडिच हजार रुपयांच्या आत आल्याने शेतकर्यांचे संपूर्ण बजेट कोलमडले आहे.
लासलगावात 700 ते 2152 रुपये प्रतिक्विंटल, राहुरीत 100 ते 2100, संगमनेर 500 त 2511, राहाता 500 ते 2300 रुपयांचा दर मिळाला. लांबलेला पाऊस आणि अवकाळीमुळे कांद्याच्या पिकाचे अतोनात नुकसान झाल्याने कांद्याने दिडशे ते दोनशे रुपये प्रति किलोचा टप्पा पार केल्याने केंद्र सरकारने तुर्कस्तानातून कांदा आयात केला होता. हॉटेल व्यवसायिकांकडून या कांद्याला मागणी होती, मात्र आता बाजारात कांद्याची आवक वाढू लागल्याने दर झपाट्याने कोसळले आहे.

Tags:
Ahmednagar