शिवभोजनमध्ये उपसवाला स्थान कधी

नगर (दि.08) :  राज्य शासनाने गरजूंसाठी शिवभोजन केंद्र सुरु करून त्यांना मदतीचा हात दिलेला आहे. याचा राज्यभरातील लोक लाभ घेत असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने आणखी थाळ्या वाढून द्या, अशी मागणी आता होत आहे. शिवभोजन केंद्रावरील थाळीमध्ये उपवासाचे काही ताटे राखीव ठेवावे, अशी मागणी आता पुढे येऊ लागलेली आहे. यावर आता सरकार काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

शिवभोजन केंद्रांना राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दिवसागणिक केंद्रांवरील थाळ्यांची मागणी वाढवावी, अशी मागणी होत आहे. त्या वाढविण्यासाठी सर्वपातळीवरून प्रयत्न सुरु झालेले आहे. या शिवभोजनाचा अनेकांना चांगला फायदा झालेला आहे. दुपारी 12 वाजता सुरु झालेले जेवन दुपारी एकच्या सुमारास संपत असल्याने अनेकांना उपाशी पोटीच माघारी परतावे लागत आहे. काही गरजूंना संकटचतुर्थी, एकादशी, शनिवारी अनेकांना उपवास असतात. मात्र त्यांना उपसवाचे पदार्थ खरेदी करणे अशक्य असते. त्यामुळे राज्य शासनाने आता या उपवासांची संख्या लक्षात घेऊन त्या कालावधीत उपवासाची थाळी ठेवण्याचा अध्यादेश जारी करावा, अशी मागणी जोर धरत आहेत.

महाशिवरात्रीला काय करायचे

महाशिवरात्री 21 तारखेला येऊन ठेपलेली आहे. महाशिवरात्र जसजशी जवळ येत आहे. तसतसे या दिवशी शिवभोजन थाळीत नेमके काय द्यायचे असा प्रश्‍न केंद्र चालकांना पडलेला आहे. शासनाकडून अद्यापही त्यावर कुठलीही सूचना देण्यात आलेली नाही. त्यामुळे शिवभोजन केंद्र चालक अस्वस्थ झालेले असून शासनाने तातडीने या संदर्भात सूचना देऊन मार्गदर्शन करावे, अशी मागणी केंद्र चालकांमधून होत आहे.

उपसवाचा मेनू ठरवा

शिवभोजन केंद्र चालकांना आठवड्यातील वार व महिन्यातून येणारी चुतर्थी व एकादशी या दिवशी उपसवाचे पदार्थ ठेवण्याची सूचना करून उपसवाचे पदार्थांच्या ताटांचे नियोजन द्यावे, अशी मागणी होत आहे.

श्रावणी व नवरात्रातील उपसवाचे पण लक्षात घ्या

आगामी काही दिवसात श्रावणी महिना लागणार आहे. या महिन्यात अनेकांना सोमवार व शनिवार हा उपसवास असतो. तसेच नवरात्रात अनेकजण नऊ दिवसांचे उपसवास करीत असतात. या उपवासांचे नियोजन करून या दिवसातही शिवभोजन केंद्रांवर उपसवाचे पदार्थ मिळण्याचे नियोजन करावे.

सुटाबुटातील हटवा

शिवभोजन केंद्रांवर सुटाबुटातील येऊन जेवणाचा लाभ घेत आहे. या सुटाबुटातील लोकांमुळे खरे लाभार्थी या योजनेपासून वंचित राहत आहे. प्रत्येक केंद्रांवर सीसीटीव्ही बसवून त्याचे चित्रीकरण जिल्हाधिकारी कार्यालयात पाहून सुटाबुटातील लोकांची चौकशी करावी, अशी मागणी जोरधरत आहेत.

चुली पेटणे झाले बंद

शिवभोजन सुरु झाल्यापासून अनेकांच्या सकाळी चुली पेटणे बंद झालेले आहे. सकाळी अकरापासूनच काहीजण नियमितपणे शिवभोजन केंद्राच्या बाहेर नंबर लावून बसलेले असतात. नियमित जेवणार्‍यांमुळेही खर्‍या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही.

Post a Comment

Previous Post Next Post