नगर (दि.06) : सीएए, एनआरसी कायद्याच्या समर्थनार्थ गुरुवारी (दि.06) हिंदूराष्ट्र सेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व हिंदूराष्ट्र सेनेचे अध्यक्ष धनंजय देसाई यांनी केले.
देसाई सकाळी दहा वाजता नगरमध्ये आले असता, त्यानी प्रथमत: इम्पिरीयल चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात हा मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला.
या आंदोलनात जिल्हाभरातून हिंदूराष्ट्र सेनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. भगवा ध्वज धरून सीएए व एनआरसी कायदा लागूच झाला पाहिजे. त्याबाबत यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. सीएए व एनआरसी देशहीतासाठी किती योग्य आहे, याबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. या मोर्चात शहर-जिल्हाध्यक्ष दिगंबर गेंट्याल यांच्यासह प्रतिनिधी उपस्थित होते.
Tags:
Ahmednagar