नगर (दि.06) : शासन आपल्या दारी योजनेअंतर्गत श्री.महेश्वर मंदिर कोळपेवाडी येथे आयोजित महाराजस्व अभियानाचे उदघाटन आज आमदार आशुतोष (दादा) काळे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी आमदारांच्या हस्ते लाभार्थ्यांना शिधापत्रिका, संजय गांधी निराधार योजना तसेच विविध शासकीय दाखले वाटप करण्यात आले.
कोपरगाव मतदारसंघाचे सार्वजनिक प्रश्न जितके महत्वाचे आहेत तितकेच महत्वाचे नागरिकांचे वैयक्तिक प्रश्न असून मतदारसंघातील नागरिकांचे वैयक्तिक प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे व यातूनच महाराजस्व अभियानाचे आयोजन केले असल्याचे यावेळी बोलताना आमदार आ.काळे यांनी सांगितले.
याप्रसंगी तहसीलदार योगेश चंद्रे, पंचायत समिती सभापती पौर्णिमाताई जगधने, उपसभापती अर्जुन काळे, जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक अशोकराव तिरसे, राजेंद्र मेहेरखांब, गौतम बँकेचे व्हा. चेअरमन राजेंद्र ढोमसे, कोळपेवाडीचे सरपंच सूर्यभान कोळपे, उपसरपंच डॉ.प्रकाश कोळपे, सुरेगावचे सरपंच शशिकांत वाबळे, उपसरपंच सुनील कोळपे, कुंभारीचे सरपंच प्रशांत घुले, कोळगाव थडीचे सरपंच विलास निंबाळकर, शहजापूरचे उपसरपंच बाळासाहेब ढोमसे, राधु कोळपे, कचरू कोळपे, वसंतराव कोळपे, ज्ञानेश्वर कोळपे, गंगाधर चव्हाण आदी मान्यवरांसह कोळपेवाडी व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags:
Ahmednagar