जेलमधून पाच कुख्यात आरोपींचे पलायन



कर्जत (दि.10) :-कर्जत येथील उपकारागृहाचे सिलिंग तोडत व छताची क़ौले उचकटुन पाच कुख्यात आरोपींनी पलायन केले. सदरचे आरोपी खून व बलात्कारा च्या गुन्ह्यात अटक होते, जुन्या पोलीस स्टेशन मध्ये चार बराकी असून यातुन सर्वात शेवटी असलेल्या बराकीत सहा आरोपी होते त्यातील पाच जणांनी बराकीत असलेले सिलिंग प्रथम तोडले व त्यानंतर छताला असलेली कौले उचकटून बाहेर येत पलायन केले.

दि.९ रोजी कर्जतच्या जुण्या पोलीस ठाण्याच्या इमारतीमध्ये असलेल्या उपकारागृहात असलेल्या एका बराकितील सहा आरोपींपैकी खून आणि बलात्कार प्रकारणातील पाच आरोपींनी कारागृहाचे छत उचकटुन व क़ौले काढून सायंकाळी सात ते साडे सातच्या सुमारास पलायन केले आहे. सदरचे आरोपी खून व बलात्कारा च्या गुन्ह्यात अटक होते, जुन्या पोलीस स्टेशन मध्ये चार बराकी असून यातुन सर्वात शेवटी असलेल्या बराकीत सहा आरोपी होते त्यातील पाच जणांनी बराकीत असलेले सिलिंग प्रथम तोडले व त्यानंतर छताला असलेली कौले उचकटून बाहेर येत पलायन केले छतावरून मागच्या बाजूला असलेल्या पोलीस वसाहती समोर उड्या मारून हे आरोप पळाले, कर्जत जामखेड या तालुक्यातीलच असलेले हे आरोपी गंभीर गुन्ह्यात अटक होते, 

आरोपींनी साधला डाव
पोलीस स्टेशन व उपविभागीय पोलीस अधीकारी यांचे कार्यालय नगररोड वरील नवीन इमारतीत हलवलेले असताना आरोपी मात्र अद्यापही जुन्या पोलीस स्टेशन मधील पुरातन बराकितच असल्यामुळे व आज रविवारची सुट्टीमुळे हा परिसर अत्यंत सुनसान असल्यामुळे या सर्व परिस्थितीचा फायदा घेत आरोपींनी नेमका डाव साधला. नवीन पोलीस स्टेशनमधील पोलीस कस्टडीमध्ये जुने फर्निचर व फलक ठेवण्यात आले असून त्याचा वापर केला गेला असता तर हा प्रकार घडलाच नसता.

Post a Comment

Previous Post Next Post