नगर (दि.06) : वाळुंज-अरणगाव बायपास रोड वरून जड वाहनांच्या दळणवळणामुळे व पूर्वीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. प्रशासनाने काही दिवसांपूर्वी तत्सम रस्त्याचे नूतनीकरणाचे काम सुरू केले आहे.
परंतु सदर रोडचे वाळुंजपर्यंतचे सुमारे दीड ते दोन किलोमीटरचे काम प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अपूर्ण आहे या रोड वरून येणार्या जाणार्या वाहनांना तसेच गावातील लोकांना खड्ड्यांमुळे खूप त्रास होत आहे व या मार्गावर अपघात होण्याची संभावना वाढू लागली आहेत तसेच या रस्त्याच्या दुतर्फा राहणार्या लोकांचे धुळीमुळे आरोग्य धोक्यात आलेले आहे
तसेच शेतकर्यांच्या पिकाची व फळाची धुळीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्यामुळे प्रशासनाने या कामात लक्ष घालून सदर रस्त्याचे लवकरात लवकर काम पूर्ण करावे अन्यथा जनाधार सामाजिक संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
Tags:
Ahmednagar