मुंबईच्या बारावर्षीय मुलीने सर केले जगातील सर्वात उंच शिखर



मुंबई (दि.10) :  मुंबईतील काम्या कार्तिकेयन नावाच्या बारा वर्षीय मुलीने अर्जेंटिना येथील जगातील सर्वात उंची असलेल्या एंडेस शिखराच्या एमटी अकोकागुआ येथे जाऊन विक्रम केल्याचे अधिका-याने सांगितले. काम्या ही सातव्या वर्गातील नेव्ही चिल्ड्रन स्कूलची विद्यार्थीनी आहे. तिने 1 फेब्रुवारी रोजी 6,962 मीट उंचीचे शिखर सर करून तिथे भारतीय तिरंगा झेंडा फडकावला.

काम्याने लद्दाख मधील 6260 मीटर उंचीचे मेंटोक कांगरी II हे शिखर अति थंडी होती तेव्हा 24 ऑगस्ट 2019 रोजी सर केले होते. यासाठी शारीरिक तसेच मानसिक तयारी आणि अ‍ॅडव्हेंचर स्पोर्टसमध्ये सहभागी होण्याची सवय तिला याच्या उपयोगी पडली. काम्यान अत्यंत प्रतिकुल आणि अडथळे पार करत हे शिखर गाठल्याचे तिने एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

तिचे वडील भारती एस कार्तिकेयन हे नाविक दलात कमांडर आहेत. तिची आई लावण्या लहानपणापासूनच शिक्षिका आहे. सुरुवातीला तिने लोणावळा (पुणे) येथे वयाच्या तीन वर्षापासून ट्रेकिंगचे मूलभूत धडे घेतले. वयाच्या नवव्या वर्षी तिने आपल्या वडिलांसोबत जाऊन हिमालयाच्या उंचीवरील शिखरे सर केली. यात 5020 मीटरवरील रुपकुंड शिखराचाही समावेश आहे.

Post a Comment

Previous Post Next Post