गाता रहे मेरा दिल ग्रुपचा एस.एस.कम्युनिकेशनतर्फे सन्मान
मदतीसाठी नेहमी पुढाकार घेणार्यांचा गौरव केला पाहिजे : प्रमोद गुंडू
नगर (दि 10) : आजच्या पिढीमध्ये सामाजिक काम करण्याची मोठी इच्छा आहे; पण कामाच्या व्यस्त कारणांने ती इच्छा पूर्ण करणे अवघड आहे. तरीसुद्धा यातून काही लोक पुढे येत सामाजिक कार्य करण्याला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे गरजुंची मदत होते, अशा उपक्रम राबविणार्या संस्था व लोकांचा गौरव केलाच पाहिजे, असे प्रतिपादन एस.एस.कम्युनिकेशनचे प्रमोद गुंडू यांनी केले.
दिल्लीगेट येथील एस.एस.कम्युनिकेशनच्यावतीने गाता रहे मेरा दिल कराओके ग्रुप व सदस्यांचा जे नेहमी गाण्याच्या कार्यक्रमातून वेगवेगळ्या गरजू, अनाथ, पुरग्रस्तांच्या मदतीसाठी निधी जमा करतात.याबद्दल त्यांच्या सन्मान प्रसंगी प्रमोद गुंडू बोलत होते. याप्रसंगी प्रिती गुंडू, चित्रकार प्रमोद रामदिन, अॅड.अमीन धाराणी, दिपा भालेराव, विकास खरात, प्रशांत बंडगर, अॅड.गुलशन धाराणी, सारिका रघुवंशी, गणेश सब्बन यांचा सन्मान करण्यात आला.
पुढे बोलतांना गुंडू म्हणाले, आपला छंद जोपासून त्या माध्यमातून समाजाची व गरजूंची मदत करणे ही मोठी बाब आहे. प्रत्येकाने असे केल्यास नक्कीच मोठ्या प्रमाणात गरजुंच्या मदतीला हातभार लागेल. सूत्रसंचालन व आभार आबिद खान यांनी मानले.
Tags:
Ahmednagar